आमदार. दिलीपराव शंकरराव बनकर
निवास :- शिवाजी नगर, मु.पो. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
फोन नं. ऑ. : (०२५५०) २५१८३२,२५१९३२, नि.: २५०६३२
फॅक्स : २५२६३२
मोबाईल नं. ०९८२३०११६३२, स्वीय सहाय्यक : ०९९७०४३०७५६
जन्मतारीख :- दि.२६ जुलै १९६४
शिक्षण :- एम.कॉम. (पुर्ण शिक्षण : पिंपळगाव बसवंत , ता. निफाड, जि.नाशिक)
क.का.वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत
निफाड तालुका...आपल्या प्रेरणा...माझे कार्य…
या वाक्याप्रमाणेच आपल्या कार्याने ओळखले जाणारे तसेच विशिष्ट ध्येयाने झपाटलेली माणसं अनेक नवनवीन, उत्तमरित्या सहकारी संस्था चालवितात. त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजेच मा.आ.दिलीपराव बनकर. शासन सर्वच स्तरावर शेतकरी, कामगार, मजुर, हमाल, मापारी, महिला कामगार या असंघटीत
नागरीकांना मदत करू शकत नाही. पण अनेक व्यक्ती एकत्र येत कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात,
हे सहकाराने दाखवुन दिलेले आहे. महाराष्ट्र राज्यात मा. यशवंत चव्हाण यांनी सहकार वाढविण्यास मोलाची भुमिका बजावली. त्याच्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्यातील सहकाराला नवी चालना व दिशा दिली. सहकाराला नेहमी पाठबळ देण्यासाठी वेळोवेळी भक्कमपणे मागे उभे राहण्याची भुमिका घेतली. त्यांचेच मार्गदर्शनातुन निफाड तालुक्यात सहकार रुजवायला मा. आ. दिलीपराव बनकर यांनी सुरुवात केली.
पिंपळगाव बसवंत या आपल्या गावातीलच महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर वडील व दोन्ही बंधु सोबत शेती व ट्रान्सपोर्टचा व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. परंतु या बनकर कुटुंबाची कष्टातुन अनेकांना घेऊन पुढे जाण्याची निती, नियतीला मान्य नव्हती. म्हणुन कि काय स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला दिनांक १५ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला त्या दरोड्यात वडील व दोन थोरले भाऊ आणि गुरखा यांचा मृत्यु झाला. वयाच्या २७ व्या वर्षी आईच्या भक्कम पाठींब्यावर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास सुरुवात केली. तेव्हापासुन धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन अडीअडचणींतील माणसाला मदत करण्याची भुमिका घेतली.
पुरस्कार - सन्मान
• सहकार रत्न व एक्सलन्स इन को-ऑपरेशन :- दि. १० ऑकटोबर २००३ रोजी नवी दिल्ली येथे मा.श्री.एम.के.आण्णा पाटील साहेब यांच्या हस्ते "सहकार रत्न व एक्सलन्स इन को-ऑपरेशन" या पुरस्काराने सन्मानित केले.
• आदर्श राजकारण :- दि. १० ऑगस्ट २००४ राजी मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूत्राप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत असल्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रातील अग्रगण्य अशा दैनिक राजवट, हिंदी दैनिक गुलजार यांचे वतीने "आदर्श राजकारण" पुरस्काराने सन्मानित.
• जाणीव पुरस्कार :- जाणीव सांस्कृतिक अभियान या संस्थने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल "जाणीव पुरस्कार".
• कृषी सन्मान पुरस्कार २०१५ :- दि.१५ जानेवारी २०१६ रोजी दि मिडिया रूट्स व मीडिया विंग यांच्या संकल्पनेतून इंडोफिल इंडस्ट्रिज लि., पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भरती विद्यापीठ यांचे प्रयोजनातून व पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने "कृषी सन्मान पुरस्कार २०१५" हा पुरस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीस प्रदान करण्यात आला.
• नाशिकरत्न (सहकार) पुरस्कार :- दि.०३ जून २०१७ रोजी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाशिक न्यूज तर्फे "नाशिकरत्न (सहकार) पुरस्काराने" नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
• कै.वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार २०१७ :- दि.२८ सप्टेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या., पुणे यांच्या तर्फे "कै.वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार २०१७ (उत्कृष्ट कार्य बाजार समिती पुरस्कार)" हा पुरस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीस प्रदान करण्यात आला.
भुषवलेली पदे
सदस्य :- सन १९९७ ते २००२ ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत
सदस्य :- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
संचालक :- सन २००७ मध्ये निफाड सहकारी साखर कारखाना लि., पिंपळस रामाचे
चेअरमन :- सन २००३ ते २००४ मध्य मध्यवर्ती सहकारी बँक लि., नाशिक या संशेचे चेअरमन पदी निवड
सध्या भूषवित असलेली पदे
सभापती :-मा. शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक. दि. १८/०३/२००० रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या लोकनियुक्त सभापती पदी निवड. (गेल्या १९ वर्षांपासून सभापती पदी कार्यरत)
संचालक :- नाशिक मध्यवर्ती सहकारी बँक लि., नाशिक
संस्थापक चेअरमन :- स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंथा मर्या. पिंपळगाव बसवंत
संस्थापक अध्यक्ष :- भीमाशंकर ग्रामोदय (शिक्षण) संस्था, पिंपळगाव बसवंत
संस्थापक चेअरमन :- शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., पिंपळगाव बसवंत.
संस्थापक चेअरमन :- विघ्नहर्ता पाणीवाटप सहकारी संस्था मर्या., पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
संस्थापक चेअरमन :- साखळी म्हसोबा पाणी वाटप सहकारी संस्था मर्या.,वावी, ता.निफाड, जि.नाशिक.
सामाजिक कार्य
• या सर्व संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक दृष्टीकोन समोर ठेऊन समाजाला चांगल्या दिशेला घेऊन जाणेकरीता विविध सामाजिक कार्य केली जात आहे.
• दरवर्षी स्व.शंकरराव बनकर (दादा), स्व. अशोकराव बनकर (आण्णा ), स्व.विलासराव बनकर (आप्पा ) यांचे स्मृतीदिनानिमित्त सन १९९८ पासुन दरवर्षी विनाखंड रक्तदान शिबीराचे आयोजन करत गेल्या २३ वर्षापासून १२५४४ बाटल्यांचे रक्त संकलन.
• नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक पदी कार्यरत असुन बँकेचा कोणत्याही प्रकारचा भत्ता स्विकारत नाही.
• पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन पदाच्या कालावधीतील कोणत्याही प्रकाचे मानधन किंवा भत्ता स्वीकारलेले नाही. त्यांचे बँकेत स्वतंत्र खाते उघडले व त्या पैशातुन सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक व वैद्यकिय कारणाकरीता गरजू व्यक्तींना माहे जुन २०१९ अखेर रु. ८ लाख ६६ हजार ११९ रुपये मदत केलेली आहे.
• पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील खेळाडुंना जागतिक अंतरविद्यापीठ नौकानयन स्पर्धेसाठी चंडीगढ येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक मदत.
• क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नौकानयन करण्यासाठी दोन बोटिंग उपलब्ध करून दिल्या.
• श्री संत जनार्दन स्वामी अनुयायांच्या सहकार्याने जिल्हास्थरीय भव्य जपानुष्ठान सोहळा.
• शेषराव महाराजांच्या उपस्थितीत भव्य व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन.
• किल्लारी (लातूर) येथील भूकंपग्रस्तांना मदत.
• कारगील युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबाना व सिंना येथील शहीद संदिप ठोक कुटुंबास मदत.
• भुज (गुजरात) येथील भूकंपग्रस्त भागाला ५० कार्यकर्त्यांसह मदत कार्यात सहभागी.
• आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप.
• दि. ९ ऑगस्ट २००३ ते दि. १५ ऑगस्ट २००३ रोजी व ऑगस्ट २००९ मध्ये रामायणाचार्य प.पु.रामरावजी महाराज ढोक यांचे संपूर्ण रामायण या कार्यक्रमाचे आयोजन.
• दि. ४ मार्च २००४ रोजी पालखेड येथे प.पु.शांतिगिरीजी महाराज, प.पु.जंगलीदास महाराज, प.पु.आण्णासाहेब मोरे यांचे प्रमुख उपस्थितीत संत दर्शन व सत्संग सोहळा आयोजन.
• महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाची सुरवात केली परंतु त्यांचा लाभ शासनाच्या निकषाप्रमाणे काही विशिष्ट गावांचं होत असल्याने शासनाच्या बरोबरीने महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये सहभाग घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार व शासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंथा मर्या. पिंपळगाव बसवंत या दोन्ही सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकूण १९ गावांमध्ये नाला, नदी, ओढा, डोह, गावतळे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम करण्यात आले. शासनाचे धोरण व निर्णयाप्रमाणे संबंधित गावाने जेसीबी मशीनची मागणी करून लोकसहभाग नोंदविला. यासाठी संस्थेच्या वतीने मागणीनुसार मोफत जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
• आज पर्यंत शेती, ट्रान्सपोर्ट, पेट्रोलपंप व कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांमध्ये सुमारे १००० बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून दिली.
• दुष्काळाच्या काळात बाजार समितीच्या माध्यमातून परिसरातील गावांना ५ टँकर व टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा तसेच ३६५ पाणी टाक्यांचे वाटप करण्यात आले. जनावरांच्या १३५०गवतांच्या गाठीचे मोफत वाटप.
• नाविन्यपुर्ण संकल्पनेतून बाजार समितीचे स्वमालकीचे जेसीबी मशीन खरेदी करून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांना, शेतकऱ्यांना शिवार रस्ते, शेतीचे रस्ते दुरुस्ती करणे, मजबूत करणेकरीता तसेच नदी, नाले, ओढे, गावतळे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करणेकरीता बाजार दाराच्या निम्म्या दराने ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले जाते.
• शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करतांना नापीकी, नैसर्गिक आपत्ती, बाजार भाव आदी संकटांना न घाबरता आपला शेती व्यवसाय अधिक चांगला अकरावा यासाठी नेहमीच पाठबळ दिले जाते. परंतु त्याही परिस्थितीत दुर्बळ झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास त्यांच्या कुटुंबाला शासन १ लाख रुपये मदत देते, तर बाजार समितीच्या वतीने रु. २५ हजार रोख स्वरूपात मदत देण्यात येते. मुलांचे शिक्षणाकरिता शैक्षणिक स्वरुपात मदत करण्यात येते. आजपर्यंत एकूण २२ आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला बाजार समितीच्या वतीने रु. ५,५०,०००/- तर अपघात झालेल्या १ शेतकऱ्यास रक्कम रु.१,००,०००/- आर्थिक मदत करण्यात आली.
• शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग उदा. जलयुक्त शिवार, वृक्षारोपण कार्यक्रम.
राजकीय वाटचाल
मा. विधानसभा सदस्य :- निफाड विधानसभा मतदार संघ सॅन २००४ ते २००९ या आमदारकीच्या कालावधीमध्ये मतदार संघामध्ये एकुण रु.७४६.४७ कोटींची विकास कामे केली. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते व पुलांकरिता रु.३०५.४६ कोटी, पाणी शेतीसाठी - रु.६१.५१ कोटी, पिण्यासाठी - रु.४५.७८ कोटी, कृषी - रु.१३७.७१ कोटी, क्रीडा - रु.१.६५ कोटी, शिक्षण - रु.३.२९ कोटी, विधी व न्याय विभाग - रु.३.५९ कोटी, आदिवासी विभाग - रु.७.५८ कोटी, समाजकल्याण विभाग - रु.७.६८ कोटी, गृह विभाग - रु.४६ लक्ष, जिल्हा परिषद विभाग - रु.६.८४ कोटी, आमदार निधी - रु.४.८० कोटी, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ - रु.४७.२९ लक्ष, वैद्यकीय मदत - रु.९४.१२ लक्ष, नाशिक जिल्हा बँकेची बाजार हस्तक्षेप योजना - रु.५६.४६ कोटी, वीज - रु.१०२.३५ कोटी.
“एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’’ या म्हणीप्रमाणे सन १९९५ मध्ये लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची दि. १८ मार्च २००० रोजी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवून सभापती पदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी दोन दोन दिवस बाजार समितीत थांबावे लागत होते. महिनाभरानंतर शेतीमालाचे पैसे मिळत होते. हे कुठेतरी थांबवावे म्हणुन शेतकरी हित नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर प्रथम येईल त्या प्राधान्याने त्याच दिवशी लिलाव, वजन काटा व २४ तासाच्या आत पैसे घेऊन घरी जात यावे या पध्दतीने कामकाज सुरु केले. हे करीत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालास इतर बाजार समित्यांच्या बाजार भावापेक्षा जास्त बाजारभाव कसा देता येईल याचा प्रयत्न केला. यामध्ये शेतकरी, व्यापारी, आडते, गुमस्ते, हमाल-मापारी व कामगार घटकांची साथ व एकत्रित काम करण्याची गरज सर्वांना पटवुन दिली. यामुळेच आज निफाड तालुक्यातील ६९ गावांच्या कार्यक्षेत्रा बाहेरील नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतीमाल पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये विक्रीसाठी येत आहे. त्याचा परिणाम म्हणुन बाजार समितीचे आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. सन २००८ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मा.आ. दिलीपराव बनकर यांच्या पॅनलच्या सर्वांच्या सर्व जागा निवडून देत एकहाती सत्ता दिली. आर्थिक नियोजन, स्वच्छ व्यवस्थापन, खर्चात काटकसर व नियमित पारदर्शकता या सूत्रांचा अवलंब केल्याने नव्याने १०० एकर जमिन स्वनिधीतून खरेदी करून त्यावर रु. ५२.९३ कोटींची विविध विकास कामे पूर्ण करून सर्व सुविधा युक्त अद्यावत असे मा. शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार उभारलेले आहे. हे बाजार आवार उभारताना एक रुपयांचे ही कर्ज बाजार समितीवर आज शिल्लक ठेवलेले नाही. याकरीता मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या नाबार्ड अंतर्गत २५ टक्के पायाभुत सुविधांसाठी असलेल्या योजनेतून रुपये ६. १२ कोटी अनुदान मिळविण्यात बाजार समितीला यश मिळालेले आहे . त्या ठिकाणी दोन भव्य प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारत १३६ गाळ्यांचे व्यापारी संकुल, ५०० शेतकऱ्यांचे निवासासाठी भव्य शेतकरी भवन, १ कोटी लिटरचे शेततळे, पाणी साठवणुकीसाठी पाणी टाकी, चार मोठे शौचालय, बायो कंपोस्ट खत प्रकल्प, प्रवेशद्वारावर ३ इलेक्ट्रॉनिक वजन काटे, चार पदरी काँक्रीटीकरण / डांबरीकरण, डिव्हायडरसह रस्ते, स्ट्रील लाईट, डिव्हायडरमध्ये व संपुर्ण बाजार समितीच्या आवारात १२००० झाडांची नव्याने लागवड करू शेतकऱ्यांसाठी बॅग-बगीच्या आदींच्या व्यवस्थेसह शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त सुपर मार्केट उभे केलेले आहे. या सुपर मार्केट मध्ये दररोज ३००० ते ४००० वाहनांमधुन आलेल्या अडीच ते तीन लाखांपर्यंत टोमॅटो कॅरेट खरेदी-विक्री, हाताळणी, पॅकिंग व लोडींगची व्यवस्था, देशांतर्गत विविध राज्यातुन आलेल्या ५०० ते ७०० व्यापाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थेत परिपूर्ण ठरलेले सुपर मार्केट उभारलेले आहे. अद्यापही विविध विकास कामे सुरु आहे. याप्रमाणे मा.आ. दिलीपराव बनकर यांनी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीस यशोशिखरावर पोहचवुन जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवुन दिला आहे. मागील वर्षी सन २०१७ -२०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात कांद्याच्या व्यवहारात पिंपळगाव बसवंत कृषी उत्त्पन्न बाजार समितीचा १ नंबर आल्याचे वृत्त सोलापुर जिल्ह्यातून आले होते. त्यास दैनिक लोकमतने प्रसिद्धी दिली होती. एखाद्या संस्थेचा विकास हा त्या संस्थेच्या वयावर गृहीत धरला जातो. परंतु मा.आ. दिलीपराव बनकर यांनी फक्त १९ वर्षात बाजार समितीची आशिया खंडातील कांदा व टोमॅटो ची सर्वात मोठी बाजार पेठ म्हणुन ओळख करून दिली. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी व कामगार यांच्याशी कुटुंबाप्रमाणे ठेवलेला प्रशासकीय समन्वयामुळे आजही आसपासच्या ५ जिल्ह्यातील शेतकरी या बाजार समितीला आपला शेतीमाल विक्रीसाठी प्राधान्य देत आहे. म्हणुनच कि काय? नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या तोंडी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा, त्यांच्या अडीअडचणींत धावून जाणारा आपल्यातला एक शेतकरी अशी ओळख तयार झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात सहकार मोठ्या जोमाने वाढला त्यातुन परिसराचा, गावाचा, तालुक्याचा, शहराचा, जिल्ह्याचा व राज्याचा विकास झाला. त्यात निफाड तालुकाही कसा मागे राहील. कै. तात्यासाहेब बोरस्ते यांनी निफाड तालुक्यात व रानवड सहकारी साखर कारखाना, विविध सहकारी जलउपसा - जलसिंचन, सोसायटी, खरेदी-विक्री संघ आदी संस्था स्थापन केल्या. त्यामाध्यमातुन त्यांनी निफाड तालुक्याला विकासाच्या परिसा जवळ नेऊन ठेवले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मा. आ. दिलीपराव बनकर यांनी विविध संस्थांची उभारणी केली. बाजार समितीत केलेल्या कामांची दखल घेत सन २०१५ मध्ये बाजार समितीच्या झालेल्या पंच वार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक नेते, शेतकरी, व्यापारी, कामगार व मतदारांचे मार्गदर्शनाने निवडणुक बिनविरोध पार पडत पुन्हा ५ वर्षे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. काकांनी त्यांच्या संपुर्ण राजकीय व सामाजिक जीवन प्रवासात एक रुपयांचाही गैरव्यवहार केलेला नाही गैरव्यवहार व भ्रष्टाचारास कधी खपवुनही घेतले नाही. म्हणुनच तर भ्रष्टाचार निर्मूलन मुक्तीचे मा. आण्णा हजारे यांनी त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली आहे. खरतर त्यांच्यामुळेच निफाड तालुक्यात व जिल्ह्यात सहकार जिवंत असल्याचे आम्हाला तरी दिसत आहे.
आंदोलने, मेळावे व राजकीय कार्य
कांदा निर्यात बंदी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, देशांतर्गत बाजार पेठेत विविध राज्यात कांदा पाठविणेकरिता रेल्वे रॅक उपलब्ध करून घेणे. इंधन दर, विजेच्या समस्या शेतकऱ्यांवर कोसळलेले विविध नैसर्गिक आपत्ती, कृषी कर्जमाफी आदी विविध मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या पुढे एक पाऊल ठेवत आंदोलनाचे नेतृत्व करून शासनास शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पडले.
मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या सभा आयोजित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वेळोवेळी केले आहे.
स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था
प्रचंड जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सामाजिक, धार्मिक व सहकारी भावनेतुन विशिष्ट कार्य करण्याच्या उद्देशाने आपले मोठे बंधु स्व. अशोकराव (आण्णा) बनकर यांच्या नावाने पिंपळगांव बसवंत येथे मकरसंक्रांतीच्या शुभ दिवशी संत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आशिर्वादाने व प.पु. १००८ महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दि. १४ जानेवारी १९९७ रोजी स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली, व अवघ्या पाच वर्षात संस्थेची स्वमालकीची पिंपळगाव बसवंत शहराच्या विकासात मानाचा तुरा असलेली भव्य वास्तु उभारली. दि. २१ जानेवारी २००२ रोजी या वास्तुचे उद्घाटन आपले सामाजिक व राजकीय गुरु मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले. आज या संस्थेचे नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असुन दि.३१ मार्च २०१९ अखेर १०६.९६ कोटी रुपयांच्या ठेवी, ७७.२३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप ,७०.७७ कोटी रुपयांची गुंतवणुक, ४६. ८४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असुन पतसंस्थेस दि. ३१ मार्च २०१९ अखेर १.९९ कोटी रुपये नफा मिळालेला आहे. संस्थेचे ब्रिद वाक्य असलेल्या ” पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा, विश्वासावर पैसा ठेवा” या संस्थेच्या ब्रिद वाक्याप्रमाणेच ठेवीदारांचा वर्षानुवर्षे विश्वास जपत वसुलीत कोणत्याही प्रकारची तडजोड न ठेवता ९६ % कर्ज वसुली करत एनपीए चे प्रमाण ०% कायम ठेवण्यात येते. सहकारी धोरणानुसार व कायद्यानुसार चालविलेल्या या संस्थेला नेहमी “अ” वर्ग मिळालेला आहे. मा.आ. दिलीपराव बनकर यांच्या कल्पना शक्तीनुसार फक्त ठेवी गोळा करणे व कर्जपुरवठा करणे व त्यातुन नफा मिळवणे हे न करता सहकाराला एका व्यावसायिक दृष्टिकोनातुन पाहिल्यास सहकार कधीच अडचणीत येऊ शकत नाही. त्यासाठी त्याला अधिक भक्कमपणे उभे करावयाचे असल्यास त्यास व्यावसायिक जोड देणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातुन परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल निर्यात करणे, साठवणुकीसाठी संस्थेच्या स्वनिधीतुन ४ एकर जागा विकत घेत २३०० मे. टन क्षमतेचे प्री-कुलींग व कोल्ड स्टोअरेज युनिट क्र १ व १५०० मे. टन प्री-कुलींग व कोल्ड स्टोअरेज युनिट क्र २ ची उभारणी केलेली आहे. संस्थेच्या तालुक्याच्या गावी १ व जिल्ह्याच्या ठिकाणी १ अशा एकूण ४ शाखा कार्यरत आहे. संस्थेस फक्त नफा मिळवणे हे साध्य न मानता सभासदांची अडीअडचणीतील माणसांची मदत कारण्याकरीता १ ऍम्ब्युलन्स, १ वैकुंठ रथ व १ पाणी टँकरची सुविधा केलेली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र निफाड तालुका असुन दि. ३१ मार्च २०१९ रोजी ६.८० कोटी रुपयांच्या ठेवी, ५.१० कोटी रुपयांचे कर्ज वाटप, ३.७० कोटी रुपयांची गुंतवणूक, १.५७ कोटी रुपयांचा निधी असुन दि ३१ मार्च २०१९ अखेर १४.८५ लाखांचा नफा मिळालेला आहे.
भीमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्था
ग्रामीण भागातील माझ्या शेतकरी, व्यापारी, कामगार बांधवांच्या मुलांना याच ग्रामीण भागात शहराप्रमाणेच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणुन सन १९९८ मध्ये प.पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते आई वडीलांच्या नावाने भीमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. आजमितीस इयत्ता १० वी पर्यंत वर्ग असुन ११३१ विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विविध ४२ खेड्यापाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करणे सोयीचे व्हावे याकरीता संस्थेच्या मालकीच्या ७ स्कूलबसची सुविधा केलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गुणवत्ता व दर्जाशी कधीही तडजोड न करता ग्रामीण भागातील शाळेचा विदयार्थी जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये मागे राहायला नको या हेतुने ३ हेक्टर जागेवर प्रशस्त सर्व सुविधायुक्त संकुलाचे बांधकाम केलेले आहे. या संस्थेत स्वतंत्र संकुलांमध्ये इयत्ता १० वी पर्यंत भिमाशंकर प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविण्यात येत असुन ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सुमारे २११० विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्व ज्ञान दानाचे काम करीत आहे. काकांचा मकरसंक्रांतीचा शुभमुहूर्तावर मोठा विश्वास असल्याने प्रत्येक नवीन कार्याची, संस्थेची व कामाची सुरुवात मकरसंक्रांतीच्या दिवशी केली जाते. त्यामुळे त्या संस्थेचा येणारा वर्धापन दिन मकरसंक्रांतीच्या दिवशीच केला जातो. या वर्धापन दिनाला संस्थेचे सभासद, हितचिंतक, मित्रपरिवार, सहकारी यांना निमंत्रण देऊन तोंड गोड करून संस्थेच्या भरभराटीस चालना देणेकरीता सहकार्य घेतले जाते.
सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
महिलांनी स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर पुरुषांच्या बरोबरीने उभे करण्यासाठी प.पु.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते दि. १४ जानेवारी २००४ रोजी सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील हजारो महिलांना मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून विचारांची देवाणघेवाण करून महिलांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेचे कार्यक्षेत्र निफाड तालुका असुन दि. ३१ मार्च २०१९ रोजी ६.८० कोटी रुपयांच्या ठेवी, ५.१० कोटी रुपयांचे कर्ज वाटप, ३.७० कोटी रुपयांची गुंतवणूक, १.५७ कोटी रुपयांचा निधी असुन दि ३१ मार्च २०१९ अखेर १४.८५ लाखांचा नफा मिळालेला आहे.शेतकरी विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्था
“विना सहकार, नाहीउद्धार” या उक्तीप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता यावा त्यांना वेळोवेळी लागणाऱ्या भांडवलाचा पुरवठा करण्यात यावा. त्यासाठी कमीत कमी वेळ खर्ची व्हावा व शेतकऱ्यांकडुन उच्च प्रतिचा शेतीमाल उत्पादीत केला जावा. या दृष्टीकोनातुन पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्थेची दि १४ मार्च २००० रोजी स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातुन दि ३१ मार्च २०१९ अखेर रु. २ कोटी, १३ लाख रुपये कर्ज पुरवठा केलेला असुन संस्थेस ११ लाख ७८ हजार नफा मिळवलेला आहे. या शेतकरी संस्थेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळावा या उदांत हेतुने तसेच बाजार भावाची स्पर्धा निर्माण व्हावी याकरीता पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरु करून मध्यस्थाची भुमिका पार पडत आहे.तसेच तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांच्या सहकारी सोसायट्यांना मार्गदर्शन व मदत करण्याची भुमिका वेळ प्रसंगी शासन दरबारी प्रखरपणे बाजु मांडण्याकरीता भुमिका घेतलेली आहे.जलवाहिन्या
शेती व्यवसायावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांच्या कुटुंबांची, मजुर कामगारांची व जनावरांची संख्या वाढत चालली आहे तर पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. गेल्या कित्येक वर्षात पाण्याचे स्रोत व जमीनीचे क्षेत्र यामुळे नवीन धरणांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे बागायती शेती करीता साठविलेला पाणी साठा वर्षभर कसा पुरविला जाऊ शकतो याचे व्यवस्थापन शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच हातात असेल तर त्याचा शेतकरी निश्चितच चांगल्या पद्धतीने उपयोग करतील या उद्देशाने पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांसाठी विघ्नहर्ता पाणी वाटप सहकारी संस्थेची सन २००१ मध्ये स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातुन १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले व वावी, नांदुर खुर्द, कुंभारी व पालखेड या चार गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या साखळी म्हसोबा पाणी वाटप सहकारी संस्थेची स्थापना केली. व तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यातील लागणाऱ्या पाण्याची किंमत ओळखुन पाणी वाटप संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
विघ्नहर्ता पाणी वाटप सहकारी संस्था
दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेती व्यवसायावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांच्या कुटुंबांची, मजुर कामगारांची व जनावरांची संख्या वाढत चालली आहे तर पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. गेल्या कित्येक वर्षात पाण्याचे स्रोत व जमीनीचे क्षेत्र यामुळे नवीन धरणांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे बागायती शेती करीता साठविलेला पाणी साठा वर्षभर कसा पुरविला जाऊ शकतो याचे व्यवस्थापन शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच हातात असेल तर त्याचा शेतकरी निश्चितच चांगल्या पद्धतीने उपयोग करतील या उद्देशाने पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांसाठी विघ्नहर्ता पाणी वाटप सहकारी संस्थेची सन २००१ मध्ये स्थापना केली.
साखळी म्हसोबा पाणी वाटप सहकारी संस्था
संस्थेच्या माध्यमातुन १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले व वावी, नांदुर खुर्द, कुंभारी व पालखेड या चार गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या साखळी म्हसोबा पाणी वाटप सहकारी संस्थेची स्थापना केली. व तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यातील लागणाऱ्या पाण्याची किंमत ओळखुन पाणी वाटप संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
मा .श्री . दिलीपराव बनकर कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळ
तालुक्यातील युवकांना, खेळाडूंना, कलाकारांना वेळोवेळी मदत करणेकरीता मा.श्री. दिलीपराव बनकर कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळ व द्राक्ष उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, चालक, मालक, द्राक्ष व्यापारी यांच्याशी सुसंवाद साधणे, एकमेकांच्या अडीअडचणी सोडविणे. प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना आपला द्राक्ष माल देशाच्या कानाकोपऱ्यात व्यवस्थित पोहचविणेकरीता, त्यांच्या मालाला चांगलाभाव मिळणेकरीता महाराष्ट्र ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो.
सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्याचे आयोजनाकरीता स्व.अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्र मंडळाची स्थापना केलेली आहे. प.पु. प्रीतिसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेतून श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थेची स्थापना केली. आज मितीस ५५० गायीचे संगोपन करण्यात येते. त्यासाठी पाणी, चारा, निवारा आदींचे व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्व. अशोकराव बनकर पुररकृत नॅशनल हायवे मित्र मंडळ, पिंपळगाव बसवंत
स्व. अशोकराव बँकर पुररकृत नॅशनल हायवे मित्र मंडळाची स्थापना मंडळाचे निफाड तालुक्याचे मा. आ. दिलीपकाका बनकर यांनी सॅन २००८ मध्ये केली. या मंडळाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, चालक, मालक, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना आपला द्राक्ष माल देशाच्या कानाकोपऱ्यात व्यवस्थित पोहोचविणेकरिता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळणेकरिता प्रयत्न करणे. सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी मंडळ आपली संस्कृती जपत सार्वजनिक गणेश उत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जातो. आजपर्यंत मोठ्या-मोठ्या प्रतिकृतींचे देखावे तयार करत पिंपळगाव बसवंत परिसरात विक्रमीगर्दीचा उच्चांक मंडळाने मोडला आहे.संस्थापक मा.आ. दिलीपकाका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हायवे मित्र मंडळाची पताका मंडळाचे विद्यमान अध्यक्ष युवकांचे मार्गदर्शक श्री. विशाल (गणेश) अशोकराव बनकर हाती घेतलेली आहे. आजमितीस यशस्वी वाटचाल करीत मंडळाचा आलेख वाढवित मंडळाची व्याप्ती जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांमध्ये नावलौकिक मिळवत आहे.
दीपावली निमित्त कार्यक्रम :
सन २०१० मध्ये खास दिपावली सणाचे औचित्य साधुन पाडव्याच्या दिवशी सांज पाडवा कार्यक्रम साजरा करीता महाराष्ट्राची लोकधारा, लख-लख चंदेरी दुनिया, मराठ मोळी संस्कृतीचा जागर या सारखे अनेक कार्यक्रम राबवित असतात. मराठ मोळी संस्कृतीचा जागरामध्ये ५० कलाकारांच्या भव्य दिव्य संचात कार्यक्रम साजरा करीत आपली लोककला साकारीत लोकांचे मनोरंजन केले.
राजमुद्रा निर्मित्त महाराष्ट्राची लोकधारा हा मराठी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ?
हे दर्शविण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला असून यामध्ये पहाटेची भुपाळी, वासुदेव, तुळसी वृंदावन पुजा, भावगीत, भक्तीगीत, शेतकरी गीत, महाराष्ट्रात साजरे होत असलेले विविध सणवार, अंबेचा व खंडेरायाचा गोंधळ , महाराष्ट्राची ठसकेबाजी लावणी, शिवराज्याभिषेक सोहळा, कोळी नृत्य, धनगर नृत्य, श्री साईबाबांची आरती आदी विविध महाराष्ट्रातील संस्कृती विषयक कार्यक्रम सादर गायन व नृत्य याद्वारे साजरे करीत मित्र मंडळाची वेगळी ओळख तयार करीत लोकांचे मनोरंजन करतात.
गणेश उत्सव कार्यक्रम :
गणेश उत्सवामध्ये मागील पाच वर्षात मोठे - मोठे देखावे उभारण्यात आले. त्यामधील श्री साई दरबार, प्रति पंढरपुर, प्रति बालाजी, प्रति जेजुरी, किल्ले रायगड, या वर्षी बाबा अमरनाथ देखावा उभारलेला आहे. या सारखे अनेक अतिसुरेख देखावे उभारण्यात येतात. गणेश उत्सवाच्या ११ दिवसात हजारो भाविक देखावे व गणेश उत्सवाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे गणेश उत्सव काळात देखावा साकारेल असताना शेजारी आजुबाजुने खेळण्याचे दुकान, पाळणे अशी एक प्रकारे जत्रा भरलेली असते.
१. सन २०१२ मध्ये श्री साई दरबार, गणेश उत्सव कार्यक्रमातील प्रति शिर्डी श्री साई दरबार आयोजित केलेला होता. देखाव्यामध्ये मंदिर, साई ची मुर्ती साकारीत गणेश उत्सवाची वेगळीच शोभा वाढवीत साजरा केला जातो. श्री साई दरबार देखाव्यात गणेश आरती, साई आरती, साईचे भजन तसेच साई भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.
२. सन २०१३ मध्ये प्रति पंढरपुर, प्रति पंढरपुर हा देखावा सुद्धा एक विशेष लक्षणिय ठरला. प्रति पंढरपुर देखावा विठु रायाची मूर्ती साक्षात पंढरपूर गेल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत असे. गणेश उत्सव काळात सायंकाळी नियमित हरिपाठ, भजने तसेच गणपती आरतीचे मानकरींना आरतीसाठी उभे राहणेपुर्वी फुगडी घेऊन उखाणा घेणे त्यानंतर विठ्ठलाची आरती असा नियमित कार्यक्रम होत.
३. सन २०१४ मध्ये प्रति बालाजी, प्रति बालाजी देखाव्यात ज्या भाविकांना बालाजीला दर्शनाला जायचे राहिलेले आहे. अशा भाविकांना जवळ दर्शन घेतल्याचा आनंद दिसत होता. बालाजी देखाव्यात दर्शन घेऊन लाडूचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होत असे.
४. सन २०१५ मध्ये प्रति जेजुरी २०१५ साली गणेश उत्सव कार्यक्रात प्रति जेजुरी देखाव्यात जेजुरी गड साकारून गडावरील मंदिराची नक्षीदार काम करून मंदिराचे प्रवेशद्वार दर्शनाला आलेल्या भाविकांना भंडार खोबऱ्याचा प्रसाद देण्यात येत होता. आरतीच्या मानकरींना गडावर प्रवेश करताना आपल्या पत्नीला पाच पायऱ्या उचलुन घेणे. वाघेमुरळींचे गाण्याने गणेश उत्सव भावमय झाला.
५ सन २०१६ मध्ये किल्ले रायगड मराठी साम्राज्याची राजधानी, महाराष्ट्राच्याच नव्हे, हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रसंग अनुभवलेला, श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” याच्या “राज्याभिषेक” सोहळ्याचा साक्षीदार असलेला “किल्ले रायगड” चा देखावा उभारलेला होता. सदर देखावा मधून आपल्या व भावी पिढीला महाराजांच्या कार्याची व मराठी स्वराज्याच्या इतिहासाची कल्पना यावी हा मंडळाचा प्रामाणिक हेतु होता.
६. सन २०१७ मध्ये बाबा अमरनाथ भारतीयांचे पवित्र तीर्थस्थळ असलेल्या “बाबा अमरनाथ” या देखावा उभारण्यात आलेला आहे. जम्मु-काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ अमरनाथ येथे गुहेत नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. या ठिकाणी हजारो -लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. अशा या पवित्र स्थळी सर्वच भाविकांना जाणे शक्य होत नाही. याकरीता गणेशोत्सव २०१७ साठी बाबा अमरनाथ चा देखावा उभारलेला होता.
७. या वर्षी पाताल भुवनेश्वर देखावा उत्तराखंड राज्यातील पिथौरागड जिल्ह्यातील पवित्र तीर्थस्थळ पाताल भुवनेश्वर या गुहेत सतयुग, त्रेता युग, द्वापार युग व कलियुग असे चार खांब आहे. यामध्ये पहिल्या तीन खांब मध्ये हजारो वर्षांपासून कोनताच बदल झालेला नाही. चौथ्या कलियुग खांब सात कोटी वर्षांपासून हे पिंड एक इंचाने वाढत असल्याची आख्यायिका आहे. या चार खांबापलिकडे गुहेमध्ये श्री गणेशाची मूर्ती असुन त्या मूर्तीच्या ठिक वरती १०८ पाकळ्यांचे ब्रम्हकमळ असून यातुन नेहमी पाणी टपकत राहते. या ठिकाणी हजारो - लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. अशा या पवित्र स्थळी सर्वच भाविकांना जाणे शक्य होत नाही. याकरीता गणेशोत्सव २०१८ “पाताल भुवनेश्वर” चा देखावा उभारून भाविकांना दर्शनाचा आनंद द्विगुणित करण्याचा मंडळाचा हा एक छोटासा प्रयत्न .
रक्तदान शिबीर : मंडळाचे स्मृतीस्थान स्व. अशोकराव शंकरराव बनकर (आण्णा), स्व.अशोकराव कोंडाजी बनकर दादा व स्व.विलासराव शंकरराव बनकर (आप्पा) यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सन १९९७ पासून सुरु करण्यात आलेला उपक्रम विनाखंड सुरु आहे. २०१७ या वर्षी २१ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन झालेले होते. या उपक्रमामध्ये आजपर्यंत ११३१७ रक्तबाटल्याचे संकलन करण्यात आलेले आहे. या वर्षी २०१७ मध्ये ६५५ रक्त बाटल्यांचे संकलन झालेले आहे. मागील दोन वर्षांपासून नाशिक येथील शासकीय रुग्णालयानेही सहभाग नोंदवित आहे.
सदर रक्तदान शिबीराद्वारे रक्तपेढीच्या माध्यमातून रुग्णांना सवलतीच्या दरात तातडीने रक्त पिशवी उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे रक्तदात्याने वर्षातून एकदा रक्तदान केल्यानंतरही रक्तदाता असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यास तसेच इतर कोणीही गरीब रुग्ण असेल त्यांना रक्त मिळविण्यास अडचण येत नाही. सदरचा उपक्रम अतिशय चांगला असुन सदर सामाजिक उपक्रमात १८ ते ५५ वयोगटातील नागरीक सहभागी होतात. सर्व रोग निदान शिबीर : चालुवर्षी २०१७ पासुन मंडळाचे वतीने नाविण्यपुर्ण उपक्रमात शासकीय जिल्हा रुग्णालय, नामको कॅन्सर हॉस्पीटल, अपोलो हॉस्पीटल, अर्पण रक्तपेढी, जिल्हा परिषद, नाशिक, तुलसी आय हॉस्पीटल, नाशिक, स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव व यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दादा, आण्णा व आप्पा यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी, औषधे चष्मे वाटप तसेच राजीव गांधी जीवनदायी अंतर्गत पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पाणपोई :
मंडळाच्या वतीने गावातील विविध भागांमध्ये उन्हाळ्यात पाणपोईची सुविधा करण्यात येते.खेळाडुंना प्रोत्साहन : गरीब व गरजु खेळात प्राविण्य असलेल्या गरीब व गरजु खेळाडुंना प्रोत्साहनपर आर्थिक मदत मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यामध्ये तलवारबाजी, क्रिकेट, बुद्धिबळ, बोटींग यासारख्या स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी स्पर्धकांना मंडळाच्या आर्थिक मदत करून प्रोत्साहन देण्यात आले.
वैद्यकिय मदत :गरीब व गरजु रुग्णांना उपचारासाठी मंडळाच्या वतीने आर्थिक मदत केली जाते. .
दहीहंडी :
मित्र मंडळाच्या वतीने गोपालकाला निमित्ताने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यात परिसरातील तरुणांचा मोठा सहभाग दिसून येतो. दहीहंडी फोडणाऱ्या गोकुळ पथकाला मंडळाच्या वतीने बक्षीस देण्यात येते. आषाढी एकादशीचे औचित्य साधुन भीमाशंकर ग्रामोदय संस्थेत शिक्षण घेणारे लहान मुलां सामावुन पिंपळगाव बसवंतमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते.जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव मित्रमंडळासाठी नाशिक जिल्ह्यातील गणेश उत्सव मित्र मंडळाच्या विभाग तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत स्व. अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्र मंडळास जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निवास :- शिवाजी नगर, मु.पो. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
फोन नं. ऑ. :- (०२५५०) २५१८३२, २५१९३२,
नि. :- २५०६३२
फॅक्स : २५२६३२
मोबाईल नं. ०९८२३०११६३२, स्वीय सहाय्यक : ०९९७०४३०७५६